जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील सहवास गतीमंद निवासी मुलांच्या संस्थेत रविवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जीवनावश्यक किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले.
एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथे सहवास मतिमंद निवासी मुलांच्या संस्थेची अत्यावश्यक गरज ओळखून जळगाव येथील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने दैनंदिन जीवनात लागणाऱ्या किराणा वस्तूंचे वाटप केले.
सावंत परिवाराने मानवसेवेचे व्रत अंगीकरलेले आमटे परिवारचे आदर्श ठेऊन समाजात सावंत परिवार प्रौढ विशेष मुलांचे पालक झाले आहेत.
सहवास मतिमंद निवासी मुलांच्या संस्थेला भेट दिली असता तेथील संस्थापक समाधान सावंत यांनी संस्थेचे कार्याची माहिती दिली. या ठिकाणी राज्यभरातील विविध दिव्यांग जे निराधार आहेत अशांना आधार देऊन संस्थेच्या संस्थापकांनी माणसाने माणसाशी माणसासम वागणे याची प्रचिती दिली.
यावेळी अध्यक्षा मनिषा पाटील, सचिव ज्योती राणे, सदस्य नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी, भारती कापडणे, किमया पाटील, उर्मिला सोनी, डॉ सुहासिनी महाजन, नेहा जगताप, शिक्षक संस्था अध्यक्ष समाधान सावंत, मनिषा सावंत व्यवस्थापक विश्वनाथ सावंत, काळजी वाहक आनंद वसईकर, रंजना सावंत, हिलाल सावंत यांच्यासह आदी उपस्थित होते.