जामनेर येथे बी.जी.वाघ फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

f049dcfc 6b51 46b0 9d73 d4972604f969

जामनेर (प्रतिनिधी) आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून येथील बी. जी. वाघ फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप वाघ यांच्यातर्फे वाकी रेाडवरील जि.प. शाळेतील १८० मुलांना स्कूल बॅग, वह्या, कंपास, चिञकला वह्या यांचे नुकतेच वाटप करण्यात आले.

 

या साहित्य वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन, रजनी चव्हाण (जि.प.जळगाव) मिलिंद लोखंडे, दादाराव वाघ, लता दांडगे, सचिव बी.जी. वाघ, तसेच राजपूत आदी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी केले. मान्यवरांचे स्वागत लता दांडगे व बी.जी. वाघ यांनी केले तर आभार अध्यक्ष संदीप वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जि.प. शाळेतील शिक्षकांनी परीश्रम घेतले.

Protected Content