मुक्ताईनगर येथे दिव्यांगांना ग्रामपंचायतीतून १५०० रुपयांचा धनादेश वाटप

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । प्रहार जनशक्तीपक्षाच्यावतीने आज ग्रामपंचायत नरवेलमध्ये दिव्यांग व्यक्तींना वार्षिक मालमत्ता करामधून 5% अखर्चित निधीतून प्रत्येकी १५०० रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

प्रहार जनशक्तीपक्षाच्यावतीने प्रत्येक वेळेस अपंगांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ते नेहमीच प्रयत्शील असतात, नेहमीच दिव्यांगांच्या पदरात यश मिळवून देतात. प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ. सोनवणे हे दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, म्हणून सारखे झटत असतात. तसेच त्यांचे सहकारी अंतुर्ली येथील माजी सरपंच विलास किसन पांडे यांच्या प्रयत्नांमुळेच आज ग्रामपंचायत नरवेलमध्ये दिव्यांग व्यक्तींना वार्षिक मालमत्ता करामधून 5% अखर्चित निधीतून प्रत्येकी १५०० रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

दिवांग्यबाबाबत असलेल्या प्रहारच्या या मागणीला मोठं यश मिळाल आहे. आज नरवेल ग्रामपंचायत येथे दिव्यांग्यांना १५०० रुपयाचा धनादेश वाटप करण्यात आले. धनादेश वाटप करतांना सरपंच मोहन सुधाकर महाजन, ग्रामसेवक प्रमोद पिउटकर, व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रहार संघटनेचे माजी सरपंच विलास किसन पांडे, सुधाकर देशमुख, गोपाळ दाणी, चंद्रकांत वंजारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या संदर्भात प्रहार संघटनेने तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनाही सदर मालमत्ता करामधून पाच टक्के निधी वाटप करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात सरपंच मोहन सुधाकर महाजन व प्रहार संघटनेचे विलास किसन पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

Protected Content