आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबियांना पालकमंत्री यांच्याहस्ते धनादेशाचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड बु. येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. आनंदा पाटील यांच्या कुटूंबियांची पालकमंत्री ना.  गुलाबराव पाटील यांनी घरी जाऊन भेट घेतली.

यावेळी पालकमंत्र्यांचा हस्ते आत्महत्याग्रस्त शेतक-याची पत्नी श्रीमती संगीताताई आनंदा पाटील यांना शासनाच्यावतीने एक लाख रुपयांच्या मदतीचे वाटप केले. पालकमंत्र्यांचा हस्ते  ३० हजार रुपयांचा धनादेश धनादेश व 70 हजार रुपयांची पोस्टाची पावती देण्यात आली.

याप्रसंगी एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार विनयकुमार देवरे, पं. स. सभापती मुंकुंद नन्नवरे , माजी सभापती अनिल पाटील, टिकाराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content