जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समाज कल्याण विभाग जि.प.जळगाव व विभागीय जात पडताळणी विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मू.जे.महाविद्यालय जळगाव येथे इ.१२वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय धोरणानुसार पुढील उच्च शिक्षणाकरिता विशेषतः अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यावश्यक असणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात राकेश पाटील (सहाय्यक उपायुक्त समाज कल्याण विभाग जळगाव) यांच्या हस्ते सदर प्रमाणपत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आबा पाटील (वरीष्ठ लिपिक- जात पडताळणी विभाग) यांची प्रमुख उपस्थिती होती. राकेश पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पुढील उच्च शिक्षणाकरिता शुभेच्छा देऊन सदर प्रमाणपत्राचे महत्त्व पटवून दिले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या के.जी.सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.श्री.आर.बी. ठाकरे, प्रा.अतुल इंगळे, प्रा.वर्षा पाटील, प्रा.डॉ. जयश्री भिरुड, सुभाष तळेले, मंगेश नेवे (वरीष्ठ लिपिक स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय) व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.