रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वस्त धान्य दुकानांवर तात्काळ धान्य उपलब्ध करून वाटप करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपा सरचिटणीस महेश चौधरी यांनी दिला आहे.
सविस्तर माहिती अशी की, जानेवारी २०२२ मध्ये रावेर तालुक्यात धान्य येत नसल्याने रेशन धान्य वाटप करण्यात येत नाही] अशी माहिती रेशन दुकानदार सांगतो. त्याप्रमाणे जानेवारी महिन्याचे मोफत धान्य बाकी असून फेब्रुवारी महिन्याचे मोफत आले आहे असे सांगण्यात येत आहे. दुसरी कडे रेग्यूलर धान्य येणे बाकी आहे. आता मार्च महिना सुरूवात झाली. तरी देखील फेब्रुवारी महिन्याचा एक दाणाही वाटप केलेला नाही. थम मशीनमध्ये डाटा येत नसल्याने फेब्रूवारीचे मोफत धान्य अद्याप वाटप सुरु झाले नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे गरीब कुटुंब प्रचंड हवालदील झाले आहे.
गरीब कुटुंबाना साखर व तेल वाटप करा महेश चौधरी
महागाईमुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबाचे हाल होत आहे. त्यांना जानेवारी महिन्यापासून साखर वाटप झालेली नाही रेशन दुकानांद्वारे तात्काळ सारख वाटप करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा सरचिटणीस महेश चौधरी यांनी केले आहे.