जळगाव, प्रतिनिधी | दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या शुक्रवारी ‘जागतिक अंडी दिन’ साजरा करण्यात येतो त्यानुसार यावर्षी आज शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी जिल्हयात विविध ठिकाणी जागतिक अंडी दिन साजरा करण्यात आला. यानुसार जिल्हा परिषदेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना अंडी वाटप करण्यात आली.
शारदा विद्यामंदिर महाबळ कॉलनी येथे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड यांच्या हस्ते ३०० विद्यार्थ्यांना २५० उकडलेली अंडी व ५० केळी ची वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी. के. टोके, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश इंगळे , प्रमुख पाहुणे वसंत इंगळे व गिरणारे सर , डॉ. आर. एस .जाधव, डॉ. सुरेश नारखेडे, डॉ. हेमराज पाटील, धर्मेंद्र चौधरी, श्री. धांडे, पाटील मॅडम, भोळे मैडम उपस्थित होते. डॉ. आर.एस.जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विनोद गायकवाड , डॉ. संजय गायकवाड डॉ. अविनाश इंगळे यांनी विद्यार्थ्यांना जागतिक अंडी दिनानिमित्त मानविय आहारात अंड्यांचे महत्व विषद केले. तसेच सर्वांनी आपल्या नियमित आहारात अंडयांचा समावेश करुन आपले आरोग्य सुदृढ ठेवावे असे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद,यांनी कळविलेले आहे.