मोदी-जिनपिंग यांच्यात महाबलीपुरम येथे भेट

images 1

महाबलीपुरम, वृत्तसंस्था | चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल झाले असून चेन्नईजवळील महाबलीपुरम येथे जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांची आज (दि.११) भेट झाली. पंचरथ येथे दोन्ही नेत्यांनी नारळपाण्याचा मनसोक्त आनंद घेतला.

 

पंचरथ या ठिकाणाला पौराणिक महत्त्व असून मोदी यांनी जिनपिंग यांना या स्थळाबद्दल माहिती दिली. जिनपिंग यांचा हा दोन दिवसीय भारत दौरा असून या दौऱ्यात मोदी व जिनपिंग यांच्यात अनौपचारिक वाटाघाटींची दुसरी फेरी होणार आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांबाबत तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा करणार आहेत. या वाटाघाटी दोन दिवस चालतील. चर्चेच्या या मालिकेतील पहिली फेरी चीनमधील वुहान येथे गेल्या वर्षी पार पडली होती.

Protected Content