चोपडा प्रतिनिधी | चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला भाडे तत्वावर देण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर आता पुढील प्रक्रिया गतीने पार पाडावी यासाठी माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी साखर आयुक्तांशी चर्चा केली आहे.
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर, चोसाका भाडे तत्वावर देण्यासाठी जो प्रस्ताव येईल त्यास आपल्या स्तरावर तात्काळ मंजुरी मिळावी द्यावी, अशी विनंती अरुणभाई गुजराथी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन केली. आयुक्तांनीदेखील सकारात्मक चर्चा केली, हा जिव्हाळ्याचा विषय असे गुजराथी यांनी यावेळी सांगितले. यामुळे चोसाका भाडे तत्वावर देण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. कारखाना लवकरच भाडे तत्वावर दिला तरच यंदाचा गाळप हंगाम शक्य होणार असल्याने आता याबाबतच्या घडामोडी गतीमान झाल्या आहेत.