जावा ४२ बॉबर ब्लॅक मिररची एंट्री : जाणून घ्या सर्व फिचर्स

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जावा मोटारसारकलने भारतीय बाजारपेठेत बहुप्रतिक्षीत ‘जावा ४२ बॉबर ब्लॅक मीरर’ हे मॉडेल लॉंच केले असून अतिशय स्टायलीश असणार्‍या या दुचाकीत विविध सरस फिचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे.

जावा मोटारसायकल कंपनीने आधीच ४२ बॉबर ब्लॅक मीरर या मॉडेलची घोषणा केली होती. आज एका शानदार कार्यक्रमात ही दुचाकी लॉंच करण्यात आलेली आहे. प्रथमदर्शनीच पाहता तरूणाईला केंद्रस्थानी ठेवून ही बाईक सादर करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हे मॉडेल अतिशय स्टायलीश आणि अल्ट्रा मॉडर्न लूक असणारे आहे. याचे मार्केटमधील एक्स-शोरूम मूल्य २.२५ लक्ष रूपये इतके आहे.

जावा मोटारसायकलने आधीच आपल्या क्रूझर मॉडेलमध्ये बदल करून नवीन व्हेरियंट लॉंच करणार असल्याचे संकेत दिले होते. सोशल मीडियातून याच्या प्रतिमा देखील जारी करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने नवीन मॉडेलमधील काही बदल हे अतिशय ठळक आणि लक्षणीय असे आहेत. यात प्रामुख्याने डायमंड कट अलॉय व्हील्सचा यात समावेश करण्यात आलेला आहे. ते हे मॉडेल ब्लॅक मिरर, मिस्टीक कॉपर, मूनस्टोन व्हाईट आणि जेस्पर रेड ड्युअल टोन या चार आकर्षक रंगसंगतींच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

जावा कंपनीच्या या नवीन मॉडेलमध्ये आधीप्रमाणेच ३३४.४ सीसी क्षमतेचे अतिशय शक्तीमान असे इंजिन प्रदान करण्यात आले असून याला सहा गिअर्सची जोड प्रदान करण्यात आलेली आहे. यात सिंगल सीट असून ती ऍडजस्ट करता येणारी आहे. सिंगल सिट हे या बाईकचे खास वैशिष्ट्य मानावे लागणार आहे. यात चार्जींगसाठी पोर्ट प्रदान करण्यात आले आहे. तर यात विविध फंक्शन्सचा समावेश असणारे डिजीटल कन्सोलदेखील देण्यात आलेले आहे.

जावा मोटारसायकलचे अनेक दशकानंतर भारतीय बाजारपेठेत पुनरागमन झाल्यानंतर विविध आकर्षक मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. यात जावाच्या पारंपरीक डिझाईनला आधुनिक फिचर्सचा साज चढवून आधी जावा ४२ बॉबर हे मॉडेल लॉंच केले होते. तर यात नवीन फिचर्सचा समावेश करत जावा ४२ बॉबर ब्लॅक मिरर हे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत लॉंच करण्यात आले आहे. आजपासून जावाच्या शोरूम्समध्ये याची अगावू नोंदणी सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Protected Content