यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथे १२ एप्रिल, २०२५ रोजी होणाऱ्या श्री बालाजी महाराज रथ मिरवणुक कार्यक्रमाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत रथाच्या मार्गावरील संभाव्य अडचणींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यात रस्ते अरुंद असणे, विजेच्या तारांची उंची आणि इतर अडचणींचा समावेश होता. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश दिले आहेत. यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापन करणे आणि इतर आवश्यक उपाययोजना करणे यांचा समावेश आहे.
पुढील बैठक ७ एप्रिल, २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये या विषयावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.