यावल नगर परिषदेत विषय समितीच्या सभापतीच्या पदांवर महिलांची वर्णी

यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदच्या विषय समितीच्या सभापतींची आज निवड करण्यात आली. महीला नगराध्यक्षानंतर आता सर्व विषय समीत्यांच्या सभापतीपदावर देखील महीलांचीच वर्णि लागली आहे.

आज यावल नगर परिषदच्या सभागृहात पिठासीन अधिकारी यावलचे तहसीलदार महेश पवार आणि मुख्याधिकारी बबन तडवी, नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत विषय समितीच्या सभापती निवडी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या विशेष सभेत एकुण १५र्निवाचीत सदस्यानी भाग घेतल्याने कोरम पुर्ण होवुन नगर परिषदच्या याच वर्षा अखेर होणाऱ्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकीपुर्वीची शेवटच्या टप्यातील विषय समितीच्या सभापती पदांची निवड करण्यात आली. यात सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी कल्पना दिलीप वाणी, शिक्षण समितीच्या सभापतीपदी रेखा युवराज चौधरी, आरोग्य वैदक व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी शमशाद बेगम महम्मद खान, महीला व बालविकास समितीच्या सभापतीपदी सईदाबी शेख हारूण यांची निवड करण्यात आली असुन तसेच पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध सभापती नगर परिषदचे नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी आणी उपनगराध्यक्ष रूख्माबाई नथ्थु भालेराव हे असतील, तर समिती सदस्य म्हणुन कल्पना दिलीप वाणी, रेखा युवराज चौधरी, शमशाद बेगम महम्मद खान व सईदाबी शेख हारूण हे असतील.

याप्रसंगी नगरसेवक व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक प्रा. मुकेश येवले, नगरसेवक राकेश कोलते, नगरसेवक अस्लम शेख नबी, नगरसेवक सैय्यद युनुस, पुर्णीमा फालक, शिला सोनवणे, मनोहर सोनवणे यांनी आपला सहभाग नोंदविला. नवर्निवाचीत विषय समित्यांच्या सभापतींचे यावेळी पिठासिन अधिकारी व तहसीलदार महेश पवार यांनी अभिनंदन केले. यावल शहरातील विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांच्या विविध प्रलंबीत समस्या आणी विकास कामांकडे अग्रक्रमांकाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नगरवासीयांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content