धरणगाव (प्रतिनिधी) येथील भारतीय स्टेट बँकेतील ग्राहकांना पैसे भरणा असो किंवा पैसे काढायचे असो, दिवसभर फिरफिर करावी लागत असल्याचे चित्र आहे. शासकीय भरण्याची वेळ ४.०० वाजेपर्यंत असते मात्र बँकेत कर्मचारी फक्त २.०० वाजेपर्यंत वेळ आहे, असे ग्राहकांना सांगत असतात. तसेच हे कर्मचारी ग्राहकांना चांगली वागणूक देत नाहीत.
त्याच बरोबर मागील आठवड्यात एका ग्राहकाचे ६,००० रुपये कोणी तरी ए.टी.एम. व्दारे काढून घेतले असता त्या ठिकाणी बँकेत तक्रार देण्यास गेला असता, बँक मॅनेजरने यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. आम्ही तक्रार घेऊ शकत नाही, असे यांनी सांगितले. अशाप्रकारे ग्राहकांना बँकेत फार त्रास होत आहे, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.