धरणगाव तहसील कार्यालयातील टॉयलेटमध्ये घाणीचे साम्राज्य

धरणगाव प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयातील टॉयलेट बाथरुममध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच याठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दैनंदिन कामासाठी तहसील कार्यालयात नागरिक येत असतात. पिण्यासाठी पाण्याची कोणतीच व्यवस्था नसून टॉयलेट आणि बाथरूम अतिशय खराब अवस्थेत असल्याने नागरिक तेथे जात नाही. वेळोवेळी कार्यालयाच्या वरिष्ठांकडे याबाबत विचारले असल्या तरी कार्यालय त्याच्याकडील दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. कार्यालयात आपली सरकार हे पोर्टल भरपूर दिवसांपासून बंद आहे. नागरिक‌ वेळोवेळी पाठपुरावा करतात मात्र, त्याच्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच जातीचे प्रमाणपत्र याचे ऑनलाइन चलन ते 33 रुपये इतके असून तरी खाजगी येथील तीनशे रुपये नागरिकांकडून वसूल केले जात आहे. तिथे कोणत्याही प्रकारचे फलक लावलेले नाही. उत्पन्नाचे दाखले जातीचे प्रमाणपत्र नॅशनल डोमेस्टिक सेल यांचे ऑनलाइन चलन कितीचे आहेत हे नागरिकांनाच कळत नाही. त्यामुळे नागरिकांची होणारी लूट बंद करावी.

 

 

Protected Content