पाचोरा प्रतिनिधी । माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज बाहेरपुरा येथील हनुमान मंदिरात नारळ अर्पण करून आपल्या प्रचारास प्रारंभ केला आहे. त्यांनी मतदारांना परिवर्तनाची साद घातली.
माजी आमदार दिलीप वाघ यांना महाआघाडीतर्फे तिकिट मिळणार असल्याचे निश्चित झाले असून त्यांनी मतदारसंघात जोरदार संपर्क मोहिमदेखील सुरू केली आहे. दरम्यान, आज शहरातल्या बाहेरपुरा भागात असणार्या हनुमान मंदिरात नारळ अर्पण करून त्यांनी आपल्या प्रचार मोहिमेस प्रारंभ केला आहे. याप्रसंगी नगरपालिकेचे गटनेते संजयनाना वाघ, बांधकाम सभापती भूषण वाघ यांच्यासह राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर पाचोरा शहरातून प्रचार फेरी काढण्यात आले. शहरातील रसूल नगर, कुर्बान नगर, बाहेरपुरा, मच्छी बाजार, हुसैनी चौक, आंबेडकर नगर, महात्मा फुले नगर, जवाहर हौसिंग सोसायटी,
गांधीचौक, सोनार गल्ली आदी भागांमध्ये प्रचार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात विकासकामांचा ठणठणाट असल्याचे सांगून मतदारांना परिवर्तनाची साद घातली.