धनगर समाज महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी दिलीप धनगर

जळगाव प्रतिनिधी | धनगर समाज महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी दिलीप धनगर यांची तसेच धनगर समाज कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश बागुल यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना, सांस्कृतिक महासंघाची नुकतीच जिल्हा बैठक संपन्न झाली. या बैठकीत धनगर समाजातील बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव सुभाष सोनवणे, मल्हारसेना प्रदेश सदस्य संदिप तेले, अहिल्या महिला संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा न्हाळदे, सांस्कृतिक महासंघाच्या सदस्या वसुंधरा लांडगे उपस्थित होते.

यावेळी सर्वानुमते जिल्हा धनगर समाज महासंघाचे माजी प्रमुख प्रभाकर न्हाळदे यांनी नवीन अध्यक्षांची घोषणा केली. यात धनगर समाज महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी दिलीप धनगर यांची तसेच धनगर समाज कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश बागुल यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष सोनवणे, विष्णु ठाकरे, सुभाष करे, रमेश सोनवणे, अरुण ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.

निवड झाल्याबद्दल रघुनाथ सोनवणे, रामचंद्र चर्‍हाटे, धर्मा सोनवणे, महेंद्र सोनवणे, डॉ.संजय पाटील, हरीभाऊ हिवराळे, हिलाल सोनवणे, गजानन निळे, रमेश झटके, नामदेव सावळे, भुषण ठोके, डि.बी.पांढरे, शेषराव वलकर, विजय पवार, प्रविण धनगर, तुळशीराम सोनवणे, संतोष कचरे, सखाराम बनसोडे, राहुल सुशिर, भरत यवस्कर, संदीप मनोरे, ऍड. शरद न्हाळदे, प्रविण पवार, सुनिल खोमणे आदींनी अभिनंदन केले आहे.

Protected Content