रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्रीदत्त जयंतीनिमित्त सुमारे १८५ वर्षाची अखंड परंपरा असलेल्या श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव निमित्ताने हजारो भाविकांच्या साक्षीने बुधवारी साजरा होत आहे. तत्पूर्वी मंगळवारी रोजी दत्त मंदिरात श्री गुरुदेवदत्त जन्मोत्सव सोहळा साजरा झाला तर बुधवारी श्री गोपाळजींच्या रथाची महापूजा होवून ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रथ ओढण्यात आला. गुरुवार रोजी श्रीं च्या पालखीचे महापूजन व दहीहंडी मिरवणूक निघणार आहे.
रावेर शहर दत्त जयंती हिंदू धर्मातील एक महत्वाचे धार्मिक स्थान असल्याने नोकरी व काम धंद्यांनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी रथोत्सवानिमित्त आवर्जून गावाकडे परततात. दत्त जयंती निमित्त पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे हरी कृष्ण संकिर्तन होणार आहे. रावेर शहरात दत्त जयंती निमित्त आज बुधवारी केशवदास महाराज, शंकराचार्य महाराज, श्रीपाद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत रथाची विधीवत पूजा करत रथोत्सवाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन रथ ओढण्यात येतो, त्यावर प्रसाद म्हणून रेवड्यांची उधळन करण्यात येते. यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.