आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षितांच्या परिसंवादाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दैनंदिन शासकीय कामकाज करत असतांना अधिकारी व कर्मचारी यांना विविध आरोग्य विषयक अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे सतत ताण तणावात राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिमाण होण्याची शक्यता असते.

सम्यक आहार व नियमित व्यायामाने आरोग्य सुस्थितीत राहते व आरोग्यास देखील याचा फायदा होतो. त्यानुषंगाने जळगावाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षित यांचे दि. १६ जानेवारी रोजी दु. ३.३० वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जळगाव येथे परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या सेमिनारमध्ये तज्ञांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा नियोजन सभागृह येथे उपस्थित राहण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी सर्वांना दिल्या आहेत.

Protected Content