आमदार खरेदी करायला भाजीपाला वाटला काय? ; गुलाबराव पाटील कडाडले

Gulabrao patil

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शिवसेनेला आमदार फुटण्याची भीती वाटते का? असा सवाल करताच सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच भडकले. आमदार खरेदी करायला भाजीपाला वाटला काय? हिम्मत असेल तर आमदार फोडून दाखवा, अशा शब्दात ना. पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

 

मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून शिवसेनेने आज बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेला जो फॉर्मुला ठरला होता. त्याप्रमाणे सत्तेचे ५०/५० टक्के वाटप व्हावी, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. दरम्यान, बैठकीनंतर ना. पाटील यांनी हिम्मत असेल आमदार फोडून दाखवा. कोण मायका लाल आहे. आमदार खरेदी म्हणजे मंडईतला भाजीपाला वाटला काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर जे उद्धव साहेब ठरवतील तेच आम्ही करू. आम्हाला एका ठिकाणी थांबायला सांगितले आहे. आता साहेब जे ठरवतील, ते आम्ही करू असेही ना. पाटील यांनी स्पष्ट केले.

Protected Content