रोहित पवार आणि आजोबांनी कायदा लिहिला आहे का?- पडळकर

नगर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे  शरद पवारांची सभा आहे, त्याचवेळी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना चौंडीच्या वेशीवर रोखण्यात आले असून  तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर रोहित पवार आणि  आजोबांनी कायदा लिहिला आहे का? असे पडळकर यांनी म्हटले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोप होणार आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद  पवारांची सभा होणार आहे. यावेळी पवार व पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने संघर्ष टाळण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा चौंडीच्या वेशीवरच पोलिसांनी रोखला आहे.

अहिल्यादेवींचं दर्शन घेऊ द्या. याबाबत २९ तारखेला पत्र दिले असून ज्याचे पहिले पत्र असेल त्याला परवानगी द्या असे कायदा सांगतो.  यापूर्वी सर्वसमावेश जयंती साजरी होत असून राष्ट्रवादीच्या नावे कधी जयंती झाली नाही. अगोदर कधी रोहित पवार आणि आजोबांना चौंडी दिसली नाही. आमचा इतिहास तुम्हाला बुजवायचा असून बहुजनांचे लचके तोडायचे आहेत, म्हणूनच हा घाट घातला.
प्रचाराचा नारळ हनुमान मंदिरात फोडत म्हातारपणी मी हिंदू आहे हे सांगण्याची वेळ आली आहे. आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी आम्ही काय दहशतवादी आहोत का? असे संतप्त होत अहिल्यादेवींच्या प्रेरणास्थानवार घाव घालत असाल तर बहुजनांची मुलेच योग्य उत्तर देतील’ असा इशाराहि पडळकर यांनी दिला आहे.

Protected Content