भुसावळ प्रतिनिधी । ऑल इंडिया एससी आणि एसटी रेल्वे कर्मचारी असोसिएशन भुसावळ मंडळाच्यावतीने दि.19 सप्टेंबर रोजी ‘डायमंड जुबली सेलिब्रेशन’ घेण्यात आले असून सेलिब्रेशन मोठ्या थाटामाटात कृष्णचंद्र सभागृहामध्ये पार पडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, ऑल इंडिया एससी आणि एसटी रेल्वे कर्मचारी असोसिएशनची स्थापना सन 1959 साली करण्यात आली होती. संस्थेस 2019 मध्ये 60 वर्षे पुर्ण होत आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे सुषमा अंधारे होत्या. त्यांनी मनोगतावेळी सांगितले की, बाबासाहेब यांचे बुध्द व कार्ल मार्क्स या प्रसिध्द पुस्तकातील काही मुद्दे सांगत भाषणास सुरुवात केली. ज्यामध्ये दुनिया के मदतगार एक हो’ या कार्ल मार्क्सची विचारसरणी भारतात का लागू होत नाही. या कार्यक्रमाला रेल्वेतील अधिकारी गण, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुधीर वांजळे, सचिव आरसी, पदाधिकारी जी.के.वर्मा, एस.एस.संवार, बी.डी.बि-हाडे, विजय भालेराव, वाल्मीक देहाडे, धामणे विकास, आरसी जाधव, विशाल सपकाळे, यांनी अथक परिश्रम घेतली. कार्यक्रमाला पुरुषांसोबत महिला निष्ठा उपस्थिती लक्षणीय होती.