जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बसस्थानकाच्या मागील गल्लीतून सायकलवर जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसकावून लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हंसराज बिहारीलाल पांडे (वय-४५, रा. महाजन नगर, मेहरूण, जळगाव) हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. ते त्यांच्या समाजातील संस्थेच्या सभेच्या पत्रिका वाटपाचे काम आटोपून ३ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता शहरातील जुने बसस्थानकाच्या मागे असलेल्या गल्लीतून सायकलने जात असताना अज्ञात ३ भामटे दुचाकीवर येऊन त्यांच्या खिशातील ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावला. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत अज्ञात भामटे पसार झाले होते. याबाबत त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तक्रारीवरून गुरुवार ३ मार्च रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चंदेलकर करीत आहे.