धुडकू सपकाळे हल्ला : हमाल मापाडी संघटनेचे कामबंद आंदोलन ! (व्हिडीओ)

2e4e924b 5273 47ea a6d4 c07053b2e726

 

जळगाव, प्रतिनिधी | फळे व भाजीपाला हमाल मापाडी जनरल कामगार संघटना अध्यक्ष धुडकू सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकाळी कामगार संघटनेच्या वतीने फळे व भाजीपाला मार्केट जळगाव या ठिकाणी काम बंद करून निषेध आंदोलन केले.

 

 

या संदर्भात अधिक असे की, मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसी हद्दीतील काशिनाथ हॉटेलजवळ हमाल-मापाडी संघटनेचे नेते तसेच नगरसेविका मीना सपकाळे यांचे पती धुडकू सपकाळे आणि गजानन देशमुख या दोघांवर तलवार व बेस बॉलच्या बॅटच्या सहाय्याने एका कारमधून आलेल्या चार जणांनी प्राणघातक हल्ला चढविला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी फळे व भाजीपाला हमाल मापाडी जनरल कामगार संघटनेने मंगळवारी रात्री पासून कुठलीही भाजीपाला व फळे मार्केटमध्ये गाडी खाली किंवा भरली जाणार नसल्याचे कळविले होते. त्यानुसार आज सकाळी देखील काम बंद आंदोलन सुरु होते. फळे व भाजीपाला हमाल मापाडी जनरल कामगार संघटनेच्या वतीने रमेश बिऱ्हाडे, संजय बोरसे, नितीन पाटील, शेख इस्माईल शेख हारून बागवान आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

 

Protected Content