धरणगाव प्रतिनिधी । सोशल मिडियाच्या माध्यमातून शिवसेना भाजपा महायुतीचा होणाऱ्या अपप्रचारबद्दल संबधीतावर गुन्हे दाखल होण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने धरणगाव पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, धरणगाव शहर व तालुकामध्ये भाजपा-शिवसेना युतीचे अतिशय खेळीमेळीचे व समंजस त्याचे संबंध असून अमळनेर शहरातील सोशल मीडियाच्यामध्ये बनावट दस्तऐवज तयार करून व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे धरणगाव शहरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी अशा पद्धतीचा मेसेज व व्हिडीओ सोशल मीडियामध्ये फिरत असून ‘अमळनेर मित्रपरिवार’ या ग्रुपमध्ये संजय ढिवरे या व्यक्तीने मेसेज टाकून चांगले वातावरण दूषित करण्याचे काम केले आहे. तरी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आचारसंहिता भंग, शांततेचा भंग, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करणे, याविषयी गुन्हे दाखल करावी अशी मागणी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी केली आहे
तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून शिवसेना भाजपा महायुतीचा होणाऱ्या अपप्रचार बद्दल संबधीतावर गुन्हे दाखल होण्याबाबत धरणगाव पोलिस स्टेशनला निवेदन देतांना भाजपा तालुकाध्यक्ष संजय महाजन, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, शहराध्यक्ष सुनील वाणी, मिडिया प्रमुख टोनी महाजन, संचालक कृउबा दिनेश पाटील, सरचिटणीस सुनील चौधरी, नगरसेवक विलास महाजन, नगरसेवक भागवत चौधरी, सुनील पाटील, भिका पाटील, योगेश ठाकरे, हरीष पाटील, अजय पारधी सर्व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.