नवी दिल्ली वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने सोमवारी या दशकातील कसोटी संघाची घोषणा केलीय. या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीला देण्यात आलेय. तर कसोटी संघाप्रमाणेच वनडे संघाची देखील निवड करण्यात आली असून कर्णधारपद धोनीकडे देण्यात आले आहे.
दशकातील सर्वोत्तम संघात तिघा भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली असली तरी एकाही पाकिस्तानच्या खेळाडूला या संघात घेण्यात आलेले नाही. अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान आणि बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन या दोघांना संघात स्थान देण्यात आले आहे. आफ्रिकेच्या संघातील एबी डिव्हिलियर्स आणि हाशिम अमला यांना तर ऑस्ट्रेलियाच्या फक्त मिशेल स्टार्कचा संघात समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा संघ- महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, जोश बटलर, राशिद खान, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, लसित मलिंगा अशा आहे.