Home Cities धरणगाव धरणगावात “महात्मा दिन” उत्साहात               

धरणगावात “महात्मा दिन” उत्साहात               

0
21

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | समस्त माळी समाजपंच मंडळातर्फे नुकताच “महात्मा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा प्रतिमेचे पुजन अध्यक्ष विठोबा माळी, उपाध्यक्ष निंबाजी माळी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सचिव गोपाल माळी यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी माळी समाज पंच मंडळाचे कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी सर यांनी महात्मा फुले यांचे बहुजन समाजासाठी केलेला संघर्ष, व त्याचप्रमाणे त्यांनी केलेले सामाजिक सुधारणा, शैक्षणिक व विधायक कार्य विशद केले. महात्मा फुले यांना कोणाचा शिफारसी मधुन ही पदवी मिळाली नाही तर जनतेने त्यांना ही पदवी दिली. याचा इतिहास सांगितला. तसेच समाजातील तरुणांना फुले यांचा विचारातुनच भारताचा प्रगतीचा मार्ग जातो. हे समप्रमाण प्रतिपादन केले. याप्रसंगी नगरसेवक कैलास माळी, आर.डी. महाजन, हेमंत माळी, विनायक महाजन, नितेश वाघ, भैय्या महाजन, भगवान तायडे, समाधान वाघ, निवृती माळी, कैलास माळी उपस्थित होते,


Protected Content

Play sound