धरणगाव युवासेनेतर्फे राज्यपालांच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी काल एका कार्यक्रमात केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ धरणगाव युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी युवा सैनिकांनी राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपस्थित अधिकारी तसेच नागरिकांनी सह्या करून निषेध नोंदविला.

महाराष्ट्राचे राज्यपाल हे संविधानीक पद असून राज्यपाल भगतसिंग कोशारी वारंवार या पदाची प्रतिष्ठा घालवीत आहेत. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास असून १०६ हुतात्म्यांनी त्यासाठी बलिदान दिले आहे. मागील काळात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत देखील असेच बेताल वक्तव्य करून मराठी माणसाच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या. आता पुन्हा देशाच्या आर्थिक राजधानीत मराठी, गुजराती, राजस्थानी असा प्रांतभेद निर्माण करून देशाच्या सामाजिक ऐक्याला सुरुंग लावण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा बेजबाबदार व्यक्तीस महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी विचारांच्या राज्याचा राज्यपाल म्हणून काम करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. केंद्र शासनाने त्यांना त्वरित माघारी बोलावून देशातील सामाजिक ऐक्य अबाधित ठेवावे अशी विनंती आम्ही.

ईडी कार्यालय आणि त्यातील अधिकारी भारतातील सर्व पक्षीय व क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न करीत आहेत? यांचे स्पष्टीकरण आपण जनतेला देणे आवश्यक आहे? अन्यथा आपल्या वर व आपल्या कोणत्याही कारवाई वर यापुढे जनता विश्वास ठेवणार नाही याउलट आपण कोणालातरी फेव्हर करीत आहात. आपल्या कारवाईचा दृष्टीकोन हा पक्षपाती असून तो प्रामाणिक नाही असा समज जास्त बळावेल. आपल्या प्रती व आपल्या कामाप्रती जनमानसात जो अविश्वास निर्माण होत आहे हे योग्य आहे का ? हे आपण ठरवावे ? आंदोलनाद्वारे करीत असल्याचे गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक अँड.शरद माळी, उप तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष देवादास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, माजी जि.प. उपाध्यक्ष जाणकिराम पाटील, मा सभापती दीपक सोनवणे, प्रेमराज पाटील, सुरेश महाजन , भागवत चौधरी, अहमद खान पठाण, जितेंद्र धनगर, किरण मराठे, उप प्रमुख कृपाराम महाजन, शिवसेना तालुका संघटक धीरेंद्र पुरभे, उप शहर प्रमुख किरण अग्निहोत्री, रवींद्र जाधव, भरत महाजन, विभाग प्रमुख गजानन महाजन, बापू (सुनील) महाजन, युवा सेना उपशहर प्रमुख कमलेश बोरसे, पप्पू कंखरे, दिपक पाटील, छोटू चौधरी, शिवसेना अल्पसंख्याक अध्यक्ष शहर नदीम काझी, लक्ष्‍मण महाजन, विजय महाजन, परमेश्वर महाजन, हेमंत महाजन, राहुल रोकडे, विलास पवार, छोटू जाधव, नागराज पाटील, सुदर्शन भागवत, भगवान महाजन, सुभाष महाजन, चेतन जाधव, पप्पू सोनार, सचिन चव्हाण, आयास सिद्दिकी, गौरव महाजन, बापू चौधरी, समाधान महाजन, आपु महाजन, रामकृष्ण महाजन, शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकडे, मीडिया प्रमुख जयेश महाजन, आदी शिवसैनिक उपस्थित होते,

Protected Content