मास्क वापरासाठी मनपा, एकता पतसंस्था करणार जनजागृती!; पोस्टरचे अनावरण

जळगाव प्रतिनिधी । शहरातून कोरोना जवळपास हद्दपार झाला असला तरी देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरावे यासाठी जळगाव शहर मनपा आणि एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्था जनजागृती करणार आहे. रविवारी मनपा अधिकाऱ्यांच्या हस्ते जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मास्क वापराने आणि योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांना मास्कबाबत जागरूक करण्यासाठी जळगाव शहर मनपाचा आरोग्य विभाग आणि एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेने पुढाकार घेतला आहे. एकता पतसंस्थेकडून शहरातील प्रत्येक किराणा दुकानावर जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात येणार आहे. रविवारी मनपाचे उपायुक्त प्रशांत पाटील, स्वच्छ भारत अभियानचे समन्वयक महेंद्र पवार, एकता रिटेल किराणा पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया, उपाध्यक्ष घनश्यामदास ललवाणी, पतसंस्थेच्या सीईओ प्रणिता कोलते, युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पोस्टर मनपा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले असून शहरात लवकरच जनजागृती करण्यात येणार आहे.

Protected Content