धरणगांव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगांव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये काल पडलेल्या अवकाळी पावसाने झोडपल्याने तालुक्यातील शेतक-याचे अतोनात नुकसान झालेले, सुलतानी संकट तर आहेच पण कालचा अस्मानी संकटांने हाता तोडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.आज आम्ही शेतकरी सेनेचे पदाधिकारी यांनी गंगापुरी,पष्टाणे,भोणे, पिंपळे,निषाने या ठिकाणी प्रत्यक्ष बांधावर येवुन पाहणी केली असता खरोखर नुकसानीने शेतकरी हवाल दिल झालेला आहे, लगेच सर्व शेतकऱ्यांनसह तहसीलदार महेन्द्र सुर्यवंशी साहेब व कृषी अधिकारी देशमाने साहेब यांना नुकसानभरपाई चे निवेदन दिले, सविस्तर चर्चा केली, साहेबांनी दोन तीन दिवसात पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार साहेबांनी सांगितले.
या प्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, मा.नगराध्यक्ष निलेश भाऊ चौधरी, अँड शरद माळी ,भागवत चौधरी, शेतकरी सेना तालुका प्रमुख विजय पाटील,गंगापुरी, निशाने, पिंपळे,भोणे, धानोरे धरणगांव येथिल शेतकरी हेमंत माधवराव पाटील, गुलाबराव गणपत पाटील, अधिकार भास्कर पाटील, संतोष बारकू पाटील, विकास पाटील, जितेंद्र पाटील, गणेश पाटील, नितिन पाटील,कोमल कोळी, संतोष सोनवणे, नंदलाल पाटील, राजेंद्र कोळी, दिनानाथ चव्हाण,शरद भादू पाटील, विनोद पाटील, केशव पाटील, निवृत्ती पाटील, भिमराव पाटील, सुनिल पाटील,मगन पाटील, आधार पाटील,छगन पाटील, राजेंद्र पाटील इत्यादी उपस्थित होते.