धरणगाव, अविनाश बाविस्कर | अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी पोलीस स्थानकात गेलेल्या नागरिकांना पोलिसांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्यामुळे स्त्री-पुरूषांनी रात्री एकच्या सुमारास ‘रास्ता रोको’ केल्याची घटना येथे घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, काल रात्री एक वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस स्टेशनच्या समोर महिला व नागरिक पारधी वाडा मधल्या महिला व पुरुष यांनी आपल्या भागातील अवैध दारू विक्री संदर्भात धरणगाव पोलीस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी आलेले होते.
पोलीस स्टेशन मधील कर्मचार्यांनी त्यांची कोणतीही दखल न घेता सकाळी बघू असे सांगत याबाबत टाळाटाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शहरातून जाणार्या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत ‘रस्ता रोको’ आंदोलन केले. धरणगाव शहरातील वेळोवेळी हा प्रश्न अनेक भागातील नागरिक विचारत असलेले तरी पोलीस स्टेशनचे त्याकडे दुर्लक्ष असते. अवैध धंद्यांकडे अधिकारी व कर्मचारी चिरीमिरी घेऊन त्या दुर्लक्ष करतात म्हणून नागरिकांच्या या प्रश्नाकडे नाराजी असल्यामुळे लोकांनी थेट रोडवरच आंदोलन केले.
दरम्यान, या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. मात्र रात्री एकच्या सुमारास करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पोलीसांची काही वेळ धांदल उडाल्याचे दिसून आले.