धरणगाव प्रवासी मंडळातर्फे हॉलिडे स्पेशल बलसाड – दानापुर एक्सप्रेसचे भव्य स्वागत

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने व धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या मागणीनुसार ०९०२५/२६ बलसाड – दानापूर एक्सप्रेसला धरणगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला. यानिमित्ताने दि. २४ मार्च २०२५ रोजी रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात श्री श्री १००८ महामंडलेश्वर ह. भ. प. भगवानदासजी महाराज यांच्या शुभहस्ते लोको पायलटचा सत्कार करून व झेंडा दाखवून ट्रेन मार्गस्थ करण्याने झाली. तसेच पहिल्या प्रवाशांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

या भव्य सोहळ्यास माजी नगराध्यक्ष अजयशेठ पगारीया, अॅड. वसंतराव भोलाणे, भाजपाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रवीण (टोनीभाऊ) महाजन, भाजपाचे शहराध्यक्ष दिलीप माळी, गितेश ओस्तवाल, धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे सदस्य तसेच रेल्वेचे डी. आर. यू. सी. सी. मेंबर महेंद्र कोठारी, रवींद्र भागवत, एस.डब्लू. पाटील, डॉ. मिलिंद डहाळे, सुनील चौधरी, आनंद बचपई, ललित येवले, किरण वाणी, हितेश पटेल, दिनकर पाटील, किरणसिंह परिहार, संतोष सोनवणे, सुशील कोठारी, बाबा कासार, सुदाम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या अथक प्रयत्नांमुळे या गाडीचा थांबा मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून भविष्यात आणखी गाड्यांचे थांबे मिळावेत, अशी मागणी प्रवासी मंडळाकडून करण्यात येत आहे.

Protected Content