Home Cities धरणगाव धरणगाव येथे संभाजी ब्रिगेडतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

धरणगाव येथे संभाजी ब्रिगेडतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

dharangaon news 1
dharangaon news 1

dharangaon news 1

धरणगाव प्रतिनिधी । संभाजी ब्रिगेड धरणगाव शहर व तालुकातर्फे धरणगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्यामुळे १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर तसेच उत्पन्न दाखला व इतर शैक्षणिक कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी उपविभागीय अधिकारी तसेच धरणगाव तहसीलदार, नायब तहसिलदार मोहोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष गोपाल पाटील, तालुका उपाध्यक्ष श्रीनाथ साळुंखे, शहराध्यक्ष त्र्यंबक पाटील, शहर कार्याध्यक्ष राकेश पाटील, सहसचिव मेघराज पाटील, तुषार पाटील, अब्रार शेख, पवन भदाणे, जितेंद्र ठाकरे, योगेश सोनवणे, विजय राजपुत, जगदीश जगताप, किरण पाटील, दिनेश भदाणे व आकाश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound