Home Cities धरणगाव धरणगाव-इंदोर नवीन बस सेवेचा शुभारंभ

धरणगाव-इंदोर नवीन बस सेवेचा शुभारंभ


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव बस स्थानकावरून इंदोरसाठी नवीन बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेचे गटनेते पप्पू भाऊ भावे, शहर प्रमुख विलास महाजन आणि वाल्मीक पाटील यांच्या हस्ते गाडीचे पूजन करून व फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

नवीन बस धरणगावहून इंदोरसाठी दररोज सकाळी ११:०० वाजता सुटेल, तर संध्याकाळी ६:०० वाजता पुन्हा इंदोरसाठी उपलब्ध राहील, अशी माहिती आयोजकांनी दिली. या सेवेमुळे प्रवाशांना इंदोर प्रवासासाठी अधिक सोयीस्कर सुविधा मिळणार आहेत.


Protected Content

Play sound