धरणगाव तिळवण तेली समाज पंच मंडळातर्फे गुलाबराव वाघ यांचा सत्कार

धरणगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदार संघात १८ वर्ष शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून यशस्वी जबाबदारी संभाळली. तर जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल गुलाबराव वाघ यांचा येथील तिळवण तेली समाज पंच मंडळातर्फे गुलाबराव वाघ यांचा सत्कार करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की,  जळगाव लोकसभा मतदारसंघाचे गुलाबराव वाघ यांनी 18 वर्षे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून यशस्वी कारकिर्द सांभाळली, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांची बढती करुन शिवसेना जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुख नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल धरणगाव तिळवण तेली समाज पंच मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी पंच भिका चौधरी, भिका पितांबर चौधरी, संजय वामन चौधरी, बापु चौधरी व राजेंद्र चौधरी (मोटार वाईडिंग वाले), नगरसेवक भागवत चौधरी, नाना चौधरी (रॉकेलवाले), जितेंद्र चौधरी, राहुल चौधरी उपस्थित होते.

याप्रसंगी पुढील वाटचालीसाठी तिळवण तेली समाजाचा पंच मंडळांनी शुभेच्छा देण्यात आल्यात. याप्रसंगी गुलाबराव वाघ यांनी आभार मानतांना सागितले कि, मी समाजाचा विकास कामासाठी व अडीअडचणी सोडवण्यासाठी आपल्या बरोबरीने खांदाला खांदा लावून प्रयत्न करील असे आश्वासन समाजाचा पंच मंडळास दिले.

 

Protected Content