धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाने सुरू केलेल्या ॲग्री स्टॅक (किसान कार्ड) योजना सुरू केली असली तरी याची अमलबजावणी होत नसल्याचा आरोप विकास पाटील यांनी केला आहे.

या संदर्भांत विकास पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकतीच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या Agri Strack (किसान कार्ड) योजना सुरू केली असून सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी हे मोठ्या संख्येने प्रत्येक गावागावात जाऊन शेतकरी बांधवांना योजनेविषयी माहिती देऊन मार्गदर्शन हे करीत आहेत. परंतु या योजनेतील व शेतकऱ्यांशी संबंधित व घनिष्ट असलेला कृषी विभाग मात्र झोपलेला आहे. कोणत्याही गावात अद्याप पर्यंत कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी कृषी सहाय्यक हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत.
कृषी विभागामार्फत वातापर्यंत कोणतेही कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास कृषी विभाग जबाबदार असेल काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र शासनाने ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली असून या योजनेच्या फायदा सर्व शेतकऱ्यांनी करून घ्यावा यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी कृषी विभाग व महसूल विभाग व CSC सेंटर तसेच इतर शासनाचे अधिकारी कर्मचारी यांना सुचित करून सर्व शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढून देण्याचे काम या सर्व विभागांना दिलेले आहे.
शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक ची नोंदणी न केल्यास प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, पिक विमा, पीक कर्ज, शेतकरी अनुदान, यासारख्या इतर सर्व शासकीय योजनांच्या लाभ मिळण्यासाठी ॲग्री स्टॅक किसान कार्ड बनवून घेने महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किसान कार्ड नसेल त्यांना या सर्व योजनांच्या लाभ मिळणार नाही त्यासाठी अग्रेसर किसान कार्ड बनवणे खूप महत्त्वाचे आहे. या साठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅकनोदणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे. धरणगाव तालुक्यात प्रत्येक गावात तलाठी मंडळ अधिकारी हे गावी गावी भेटी देत असून ॲग्री स्टॅक योजनेविषयी सर्व शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. व फार्मर आयडी बनवून देत आहेत.
परंतु दुसरीकडे मात्र धरणगाव कृषी विभाग या योजनेबद्दल उदासीन दिसून येत आहे. कृषी विभागाचे कोणतेही कर्मचारी व कृषी सहाय्यक किसन कार्ड या योजनेची माहिती देण्यासाठी अध्याप पर्यंत गावात पोहोचलेली नाहीत अशी माहिती शेतकऱ्यांनी दिलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबतीत दखल घेऊन कृषी विभागाला जागृत करावे अशी मागणी धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांन कळून केली जात आहे.