मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्टच्या जिल्हा युवक अध्यक्षपदी धनराज साळुंके

जळगाव प्रतिनिधी । मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट, नवी दिल्ली संस्थापक व राष्ट्रीय कार्यकारी दिनेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली धनराज साळुंके यांची जळगाव जिल्हा युवक अध्यक्षपदी नुकतीच नियुक्त करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे यांनी नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

धनराज साळुंके हे मुळ राहणार पिंपळकोठा, ता.एरंडोल, जि.जळगाव येथील आहेत त्यांना समाजाचे कामासोबतच सामाजिक कार्याची आवड आहे. गेल्या दहा वर्षांपासून अखिल भारतीय कोळी समाजाचे निष्ठावान कार्यकर्त्यां पासून ते जिल्हा अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. आपल्या राजकीय आयुष्यात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय राहून  माजी मंञी गुलाबराव देवकर यांचे ते अंत्यंत विश्वासू व निकटवर्तीय आहेत. पक्षाने त्यांची विश्वासार्हता पाहता राष्ट्रवादी युवक काँग्रेस धरणगाव तालुका उपाध्यक्ष म्हणून जबादारी दिलेली आहे. नेहमी समाजाचे व सामाजिक विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करून गरजवंताना सहकार्य करत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना जळगाव जिल्हा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश आई.टी.सेल सचिव डॉ. राजनराम जैसवार, राष्ट्रीय प्रभारी संजय गुप्ता, महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश बाविस्कर, सचिव ज्ञानेश्वर पाटील, जळगाव महानगर प्रमुख किरण भावसार, जिल्हा युवक उपाध्यक्ष उमेश निकुंभ व मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.

धनराज विठ्ठल साळूंके यांचे निवडीचे परेश कोळी, राज्य युवा अध्यक्ष,अखिल भारतीय कोळी समाज, प्रवीणकुमार बाविस्कर, महीला पदाधिकारी डाॅ.रूचिता धनगर, वर्षा बाविस्कर, मंगलाताई सोनवणे,अॅड.शोभाताई खैरनार, भिकन नमस्कार, सुनिल नंन्नवरे, गोपालशेठ नंन्नवरे,रवीशेठ नंन्नवरे,अजय नंन्नवरे,सचिन बाविस्कर, हिरालालभाऊ वाकडे आदींनी अभिनंदन केले.

 

Protected Content