जळगाव (प्रतिनिधी)। ऑल इंडिया पोलीस दलातर्फे आयोजित 67 वी अखिल भारतीय रेसीलिंग क्लस्टर स्पर्धा 2019 दि.27 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत जयपूर राजस्थान येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सदर स्पर्धेत जळगाव पोलीस दलाचे कर्मचारी कॉ.धनराज अशोक गुळवे यांनी आपल्या खेळात उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत 75 किलो वजन गटामध्ये कांस्य पदक प्राप्त करून जळगाव चे नाव उंचावले.
राजस्थानचे पोलीस महासंचालक यांच्या हस्ते त्यांना चषक व पदक देऊन गौरविण्यात आले.त्यांच्या या उत्कृष्ट अशा कामगिरी बद्दल जळगाव पोलीस अधीक्षक पंजाबराव देशमुख, होम डी.वाय.एस.पी. केशव पातोंड तसेच राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे, पोलीस दलाचे सर्व कर्मचारी वृंद यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.