Home Cities चोपडा धानोऱ्यातील तरुणाने घुबड पक्षाला दिले जिवदान (व्हिडीओ)

धानोऱ्यातील तरुणाने घुबड पक्षाला दिले जिवदान (व्हिडीओ)


68f4bc6d b573 4c16 be4d bfa04cfa1177
 

धानोरा ता.चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील धानोरा येथे उस्माघाताचा फटका बसलेल्या शिंगळ्या प्रजातीच्या घुबडाला नुकतेच गावातील तरुणामुळे जीवनदान मिळाले आहे.

 

येथील दिपक साळुंखे यांच्या घराजवडील निंबाच्या झाळाच्या थडग्याला लागून शिंगळ्या प्रजातीचे घुबड उष्माघातामुळे गंभीर अवस्थेत आढळून आले होते. साळुंखे यांनी या घुबड पक्षाला पाहिले व त्याला पाणी पाजले. त्यानंतर घुबडाला धानोरा येथील वनविभागीय कार्यालयातील कर्मचारी यांच्या ताब्यात दिले. तसेच वनविभाग अधिकारी अतुल जैनक यांनी घुबडाचा तपशील करुन सांगितले की, या पक्षाचे नाव हे प्राच्य शिंगळ्या घुबड, असे आहे. या घुबडाला उडता येत नसल्यामुळे वनविभागीय अधिकारी जैनक यांनी त्याला पशुवैद्यकिय दवाखाण्यात पाठविले होते. दरम्यान, जखमी घुबडावर उपचार करुन नंतर त्याला सोडण्यात येईल,अशी माहिती देखील श्री.जैनक यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound