अमळनेर येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

mygov 10000000001363170803 370x226

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेत ११ वी व त्यापुढील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी इच्छुकांनी ५ मे पूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

 

या कार्यशाळेत प्रत्यक्ष अधिकारी वर्ग मार्गदर्शन करणार आहेत, संपूर्ण करिअरबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे.प्रश्नमंजुषा, सामान्यज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धा, गीतगायन, चालता-बोलता अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या व यशस्वी ठरणाऱ्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती एक्न्यचि व त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी, एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, एएसओ, एनडीए, ग्रुप सी, बँक, रेल्वे, पोस्ट, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक अशा सर्वच परीक्षांचे मार्गदर्शन केले जाईल. ही कार्यशाळा ८ मे ते १२ मे दरम्यान सकाळी ८.०० ते १२.०० या वेळात, पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात घेण्यात येईल. ज्यांना कार्यशाळेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी स्पर्धा परीक्षा प्रमुख विजयसिंग पवार ८००७५३५०९३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Add Comment

Protected Content