धरणगाव राष्ट्रवादी बैठक : देवकरअप्पांना विधान परिषदेवर घेण्याचा ठराव

126079 deokargulabrao31

धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाने माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना विधान परिषदेवर घ्यावे, या आशयाचा ठराव आज राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ठरावाची सूचना जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे यांनी मांडली होती.

 

शहर राष्ट्रवादी कार्यालयात लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीबाबत चर्चा करण्यासाठी आज तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना विधान परिषदेवर घेणे गरजेचे आहे. कधीकाळी पक्षाचे जिल्ह्यात सर्वाधिक आमदार होते. त्यामुळे आगामी काळात पक्ष कमकुवत पडू नये, यासाठी देवकर अप्पा यांना सत्तेत सामावून घेणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघामारे यांनी मांडली. या सूचनेला देवरे आबा यांनी अनुमोदन दिले. त्यांनतर सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. आज झालेल्या बैठकीला माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगरसेवक निलेश चौधरी, देवरे आबा, डॉ.मिलिंद डहाळे, मोहन पाटील, नईम काजी, राजू शेख, नारायण चौधरी, रवी महाजन,सीताराम मराठे, संभाजी धनगर, कोमल पेहलवान यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content