Home Cities धरणगाव धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित

धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित

0
102


धरणगाव (प्रतिनिधी) लोकनियुक्त नगराध्यक्ष सलिम पटेल यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरम्यान, महाविकासआघाडीसाठी आधीच शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी साद घातलेली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत भाजपविरुद्ध महाविकासआघाडी असा सामना होतो की, राष्ट्रवादी मैदानात उतरते याबाबत एकच चर्चा सुरु झाली आहे.

 

असा आहे निवडणूक कार्यक्रम

 

मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख २५ नोव्हेंबर २०१९

नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख ४ ते १२ डिसेंबर २०१९ (वेळ ११ ते २ )

नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी ४ ते १२ डिसेंबर २०१९ (वेळ ११ ते ३)

छाननी व वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे १३ डिसेंबर २०१९ (सकाळी ११ वाजेपासून)

उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत)

अपील तारीख २० डिसेंबर

निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवार यादी : १८ डिसेंबर

मतदान दिनांक २९ डिसेंबर सकाळी ७ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत

मतमोजणी व निकाल : ३० डिसेंबर सकाळी १० वाजेपासून

 


Protected Content

Play sound