सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कृतज्ञता संवाद यात्रेतंर्गत सातव्या दिवशी युवा नेतृत्व धनंजय चौधरी यांनी के-हाळे खु, केऱ्हाळे बु आणि भोकरी येथे जनसंपर्क दौरा केला. कै. मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टी कोणातून अभोडा व मंगरूळ येथे बंधारे बांधण्यात आले. येथे बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे पाण्याची जल पातळी उंचावल्यामुळे हा भाग सुजलाम -सुफलाम व सधन झाला जो विकास झाला. तो पूर्वजांच्या दृष्टिकोनामुळे झाला अशी कृतज्ञता गावकऱ्यांनी व्यक्त केली. या दौऱ्यानिमित्त दुष्काळाची नको असेल आपत्ती तर आजच जपा जलसंपत्ती या उक्तीप्रमाणे दौऱ्याची सुरुवात के-हाळे बु येथे जलपूजन करून सुरुवात करण्यात आली. नंतर वृक्षारोपण तसेच धनंजय चौधरींनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर के-हाळे बु आणि भोकरी या गावात सुद्धा जलपूजन आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर रावेर-यावल तालुक्याचे आमदार शिरिष चौधरी यांनी केलेल्या कामांबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी केऱ्हाळे बु. येथे जलपूजन माजी सरपंच विजय पाटील, सुनील पाटील, अमोल पाटील, राजेंद्र इंगळे, महेंद्र वानखेडे, भास्कर भाईजी, अशोक पाटील, रमेश पाटील, किशोर पाटील, गुणवंत भाऊ, रवींद्र बिल, अंबादास वंजारी, जितू महाजन, राहुल महाजन श्रीराम व्यायामशाळा अध्यक्ष, प्रवीण महाजन, शांताराम पाटील, हरी बोंडे, गोकुळ पाटील, गोपाल पाटील, नितीन लहासे, अतुल पाटील, पवन पाटील, यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले.
केऱ्हाळ खुर्द येथे कैलास काकडे, सुनील खेडकर, विजय हडपे, दिनकर सोनवणे, तुषार सोनवणे, दीपक सोनवणे, माजी सरपंचकुरबान तडवी, भीमराव तायडे, नरेंद्र सोनवणे, जितेंद्र सोनवणे, भूषण कापडे, यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. भोकरी येथे जलपूजन माजी सरपंच अतुल पाटील, किशोर चौधरी सरपंच, डेपो. मिलिंद लाहसे, मेंबर धनराज लहासे, विकास लहासे, अशोक आटकळे यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले.
वृक्षारोपण माजी सरपंच विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र इंगळे, माजी उपसरपंच अशोक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.के-हाळे खुर्द येथे ग्रामपंचायत सदस्य हनीमा तडवी, ग्रामपंचायत सदस्य शकीला तडवी, आत्माराम सोनवणे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कुर्बान तडवी, भीमराव तायडे, मेहरबान तडवी, सलीम तडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.भोकरी येथे वृक्षारोपण प्रमोद लहासे, देवराज लहासे, विनायक लहासे, यांच्या हस्ते करण्यात आले. धनंजय चौधरी यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर केराळे येथे जाऊन दर्शन घेतले त्याप्रसंगी गावातील समस्त वरिष्ठ मंडळी उपस्थित होते.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर केराळे येथील मंदिर ट्रस्ट तर्फे धनंजय भाऊ चौधरी यांचा पुष्पहार टाकून सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी मंदिर चे ट्रस्टी आणि मंदिर चे सदस्य सर्व उपस्थित होते. भोकरी येथे किशोर चौधरी, माजी सरपंच दत्तू पाटील, रवींद्र चौधरी, रामदास लाहासे सरचिटणीस,गनी तडवी यांच्या हस्ते मा.धनंजय भाऊ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.