यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील भालोद येथे पितृपक्षाचे ऊन आणि त्यात पाऊस् निसर्गाने बदललेले उग्ररूप असे असतांना ही देखील आपल्या प्रेमाच्या लोकाना भेटण्या साठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी कृतज्ञता संवाद दौरा सुरू असल्याचे धनंजय चौधरी यांनी सांगितले.
रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील युवा नेतृत्व धनंजय चौधरी यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले भालोद या गावी कृतज्ञता संवाद दौरा संपन्न झाला. ऐतिहासिक वैभवशाली व प्रतिभा संपन्न असलेल्या या गावात खूप मोठा शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला असून रावेर व यावल तालुक्यातील पहिले विद्यालय सुद्धा १९२२ साली सुरू झालेले आहे. तसेच या शाळेने मोठ्या प्रमाणात डॉक्टर, इंजिनियर,खासदार तसेच आमदार तसेच आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री जे. टी .महाजन यांचे शिक्षण सुद्धा याच विद्यालयात झालेले आहे.तसेच १९२९ साली या विद्यालयास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन विद्यालयाप्रती अभिप्राय सुद्धा दिलेला होता. तसेच या गावी अक्षय तृतीया या सणानिमित्त गावात मोठी यात्रा भरते व मरीमाता व खंडेराव महाराज यांच्या नावाने बारागाडे सुद्धा ओढले जातात.
अशा या गावांमध्ये कृतज्ञता यात्रेची सुरुवात प्रथम गावातील जागृत मनुदेवी मंदिर, खंडेराव महाराज मंदिर, मरीमाता मंदिर, हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन सुरू करण्यात आली. याप्रसंगी गावातील जुन्या विहिरी वरती जलपूजन मोहन वासुदेव चौधरी, लीलाधर विश्वनाथ चौधरी, किशोर लक्ष्मण महाजन, नितीन वासुदेव चौधरी, मधुकर गिरधर परतणे, पप्पा नारायण बिस्कुटे, संजय वामन बोरोले व भालोद ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गावाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान देऊन मयत झालेल्या व्यक्तींप्रती एक झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी गावातील तरुण वृद्ध ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यादरम्यान धनंजय भाऊ यांनी भालोद गावामध्ये ग्रामफेरी करून गावांतर्गत असलेल्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या तसेच महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी देण्यात आल्या याप्रसंगी धनंजय भाऊ यांनी हाती घेतलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल ग्रामस्थां मार्फत धनंजय भाऊ यांचे कौतुक करण्यात आले.
या दरम्यान श्री कुलस्वामिनी देवघर देवस्थानाचे धनंजय चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच भालोद ग्रामस्थांच्या वतीने सुधीर चौधरी व मोहन वासुदेव चौधरी यांनी धनंजय चौधरी यांचा जाहीर सत्कार केला. आमदार शिरीष चौधरी यांनी भालोद या गावासाठी विविध विकास निधी तसेच आमदार निधी देऊन गावांतर्गत गटारी,सिमेंट रस्ते,पेवर ब्लॉक, जिल्हा वार्षिक योजनेमार्फत अंगणवाडी बांधकाम,भालोद गावांतर्गत सभागृह बांधकाम, बाळासाहेब देवराम सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ पुरवणे, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी,सावखेडा,परसाडे,डोंगरकठोरा,भालोद, बामनोद, विरोदा, पिपंरुड, फैजपूर मार्ग प्रतिमा १३ मजबुती करण व डांबरीकरण करणे,भालोद, हिंगोणा व न्हावी रस्ता विशेष दुरुस्ती असा मोठ्या प्रमाणात निधी देऊन कामे पूर्ण केलेली आहेत. त्याप्रती गौरव उद्गार ग्रामस्थांनी धनंजय चौधरी समोर बोलून दाखवले.
या कार्यक्रमाप्रसंगी जलपूजन व वृक्षारोपणास भालोद गावातील मोहन वासुदेव चौधरी,लीलाधर विश्वनाथ चौधरी, किशोर लक्ष्मण महाजन, नितीन वासुदेव चौधरी, मधुकर गिरीधर परतणे, आप्पा नारायण बिस्कुटे, संजय वामन बोरोले,नितीन वासुदेव चौधरी, मोहन वासुदेव चौधरी,मधुकर गिरधर परतणे संजय वामन बोरोले,मौलाना रिजवान फलाई,डॉ.तुषार चौधरी,अॅड. विनोद परतणे, ललित चोपडे, खाटीक नवाब शेठ, ज्ञानेश्वर नरेंद्र परतणे,तुषार गेंदू झांबरे, गुणवंत बोरोले,पंडित विष्णू चौधरी, दगडू तडवी ,बळीराम किसन कोळी , भागवत कोळी,मुकुंदा भालेराव उपस्थित होते.