सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काँग्रेसचे युवानेतृत्व धनंजय चौधरी यांनी आज ११ ऑगस्ट रविवार रोजी कृतज्ञता संवाद यात्रेत अजनाड चोरवड, दोधे,नेहेते, अटवाडे या गावांचा दौरा केला. तापी तीरावरील सुजलाम सुफलाम गावांमध्ये युवा नेते धनंजय चौधरी यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जुने जाणकार नेते मधुकरराव चौधरी यांनी हतनूर धरण केल्यामुळे तापी तीरावरील लोकांच्या जीवनात व राहणीमानात फार फरक पडला तरीपण सरकार शेतीमालाला योग्य भाव देत नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती परवडत नाही जिल्ह्यातील 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.तरुणांना रोजगार नाही म्हणून महिलांना स्वयंरोजगार तयार करता आला पाहिजे यासाठी वेगवेगळे उद्योग उभारता आले पाहिजे.
अजनाड, अटवाडे येथील लोकांनी दिवंगत माननीय मधुकरराव चौधरी यांनी प्रथम निवडणूक वेळी लोकवर्गणी जमा करून दिल्याची आठवण वृद्ध लोक काढत होते. त्यांच्या पुण्याईचा व आमदार शिरीष चौधरी यांनी केलेल्या विकास कामांमुळे गावकऱ्यांचे समाधान आहे.महागाई बेरोजगारी औषधोपचार परवडत नाही म्हणून शासनाने यावर उपाय करावा अशी मागणी गावातील गावकऱ्यांनी धनंजय भाऊ समोर मांडले. त्याप्रसंगी गावकऱ्यांनी धनंजय चौधरी यांनी सविस्तर चर्चा केली त्यांच्या अडचणी मांडल्या यावेळी बहुतांश गावकरी उपस्थित होते वरील गावांमध्ये धनंजय चौधरी यांनी गावकऱ्यांच्या हस्ते जलपूजन व वृक्षारोपण करण्यात आले. विनोद महाजन,वसंत रजाने, यांच्या हस्ते चोरवड येथील जलपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी गाव मंडळी मनोज महाजन, सुभाष महाजन, प्रशांत रजाने, राजू महाजन, ग्राम. पं. शिपाई हर्ष कुमार घेटे,प्रवीण महाजन यांची उपस्थिती लाभली. धनंजय चौधरी, सरपंच-नितीन पारधी, अरुण पाटील ह्यांच्या हस्ते जलपूजन व वृषारोपण करण्यात आले. त्या प्रसंगी सुभाष महाजन, ज्ञानेश्वर धनगर,अशोक महाजन, फकिरा भोई,योगेश पाटील,यांची उपस्थिती लाभली.
अटवाडे येथील जलपूजन सरपंच किरण कोळी, चंद्रकांत पाटील, जयेश कुयटे, संतोष त्रबक पाटील ह्यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी गावातील युवा मंडळी भगवान धनगर,बबलू पाटील,नितीन अग्रवाल उपस्थित होते. दोधें येथील जलपूजन सरपंच गोपाळ महाजन, निवास पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी गावातील युवा मित्र प्रवीण पाटील, राहुल महाजन, अशोक महाजन, भूषण पाटील, हर्षल महाजन, जीवन घेटे, राजेंद्र पाटील, कैलास पाटील, गोकुळ पाटील अजून, राजेश घेटे, नकुल महाजन यांची उपस्थिती लाभली. नेहेते येथील जलपूजन व वृषारोपन येथील ज्येष्ठ नागरिक सुरेश पाटील,बाळु पाटील,भगवान ,योगेश पाटील ह्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्या प्रसंगी गावातील युवक व नागरिक उपस्थित होते.
अजनाड येथील वृक्षारोपण- सरपंच रमेश पारधी, सुभाष महाजन,अरुण पाटील , द्यानेश्र्वार डेअरी वाले ह्यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी गावातील समस्त युवा मंडळी उपस्थित होती. नेहेते येथील वृक्षारोपण उज्वल कचरे, राजेंद्र पाटील, संजू महाजन, नितीन पाटील यांच्या हस्ते नेते येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील युवक मंडळी चेतन सावळे, गौरव पाटील, प्रणय पाटील, शुभम कोळी, राहुल तायडे, गणेश कोळी यांची उपस्थिती लाभली. धनंजय भाऊ चौधरी यांनी अजनाड येथील गुल्हेश्वर महादेव मंदिर येथे दर्शन घेतले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित मंडळी मा. धनंजय भाऊ यांच्यासोबत होते.सरपंच नितीन पारधी पारधी, मेंबर प्रकाश भोई, रामू भोई, बाळू महाजन,सुभाष चौधरी, विनायक महाजन हे सोबत होते.