धनाजी नाना महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा

faizpur 1

 

फैजपूर प्रतिनिधी । तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जागतिक आदिवासी दिन नुकताच साजरा करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, प्रमुख मार्गदर्शक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ताराचंद एम. सावसाकडे यांनी आदिवासी जीवन व संस्कृतीचे महत्व सांगत, त्यांनी आदिवासी समुदाय हा भारतातील मूळ समुदाय आहे. आजही या समुदायाने आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी झटतो असते. त्यांनी आपल्या व्याख्यानात जागतिक स्तरावरील, भारतातील व महाराष्ट्रातील आदिवासी समुदायाची ओळख करून दिली. त्यासोबतच हा समुदाय निस्वार्थी, समाधानी आहे. हा परिस्थितीत निसर्गाशी जुडवून आपले जीवन जगत असतो. या समुदायकडून वनऔषधीं, पर्यावरणाचे संरक्षण कसे कराचे हे प्रगत समाजाने शिकण्यासारखं आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी व सहाय्यक अधिकारी डॉ. शरद बिऱ्हाडे, डॉ. रवी केसुर, डॉ. सरला तडवी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु. साक्षी पाटील या विद्यार्थ्यांनी केले.

Protected Content