Home Cities रावेर धनाजी नाना महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

धनाजी नाना महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


सावदा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सण उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. राजेंद्र तायडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर विस्तृत प्रकाश टाकला. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रा. मनोहर सुरवाडे यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदात्त विचारांचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकरांच्या विचारांमधून आपल्याला एक उत्तम आणि आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.

या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राष्ट्रीय सण उत्सव समितीचे प्रमुख डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली. या महत्वपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदराने स्मरण केले.


Protected Content

Play sound