धनाजी नाना महाविद्यालया जागतिक पर्वत दिवस साजरा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, येथील प्राणीशास्त्र विभागामार्फत २४ डिसेंबर पर्वतीय रांगांमध्ये प्राण्यांचे संवर्धन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करतात पर्वत दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.एस. व्ही.जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.डॉ.सविता वाघमारे यांनी केले. प्रमुख वक्त्या डॉ.राजश्री नेमाडे यांनी प्राण्यांचे संवर्धनाबाबत आणि पर्वतीय रांगांबद्दल सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रंचालन व आभार स्नेहल महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सागर धनगर, प्रा.किरण फेगडे,प्रा. उत्कर्षा कोल्हे, प्रा.कविता इंगळे,प्रा.खुशबू भंगाळे, देविदास तायडे, गणेश चव्हाण, दिलीप मेढे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content