मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारानंतर अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय मुलीने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ मे रोजी रात्री ९ वाजता घडली होती. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार ती गर्भवती असल्याने तिने कंटाळून आत्महत्या केली आहे, दरम्यान अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अत्याचार करून ती गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर तिने कोणालाही काहीही न सांगता १६ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास विषारी औषध पिऊन आत्महत्या केले. या संदर्भात मुक्तानगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना मे महिन्यात घडली असली तरी याबाबत काल मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.