भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | संत मुक्ताबाईच्या ७२५ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरवरून आलेल्या पांडुरंगाच्या पादुकांचे भुसावळ येथील विठ्ठल मंदिरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली.
उद्या बुधवार, दि.२५ मे रोजी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईचा सातशे पंचविसावा अंतर्धान सोहळा आहे. या सोहळ्यासाठी पंढरपूर येथून निघालेल्या पांडुरंगाच्या पादुकाचे भुसावळ येथील विठ्ठल मंदिर वार्डातील विठ्ठल मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले. भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
या अंतर्धान सोहळ्यासाठी वर्षभरापासून ५० संस्थानांनी भजन, कीर्तन हरिनामाचा अखंड जयघोष कोथळी येथील मुक्ताई मंदिरामध्ये सुरू ठेवला आहे. या सोहळ्याची सांगता करण्यासाठी कौंडण्यपूर येथून रुक्मिणी संस्थान, त्र्यंबकेश्वर येथील संस्थान, सासवड येथील संस्थान आळंदी येथील संस्थानचे मुख्य मुक्ताईनगर मंदिरात पोहोचलेले आहेत. असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत उद्या मुक्ताईनगरमध्ये मुक्ताबाईचा अंतर्धान सोहळा संपन्न होत आहे.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/379540270790688