नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देवेंद्र फडणवीस हे मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी घोषीत केले असले तरी त्यांनी उपमुख्यमंत्री बनावे अशी अपेक्षा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता शिंदे यांच्यासोबत फडणवीस हे देखील मंत्रीमंडळात असतील असे स्पष्ट झाले आहे.
आज देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले. तसेच आपण मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आपले सहकारी हे मंत्रीमंडळात असतील असेही त्यांनी सांगितले होते. यामुळे फडणवीस हे कदाचित प्रदेशाध्यक्ष बनतील असे मानले जात होते. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मात्र वेगळीच अपेक्षा व्यक्त केली.
नड्डा यांनी दिल्लीत सांगितले की, भारतीय जनता पक्षाला सत्तेचा मोह नसून याचमुळे आम्ही शिंदे यांना पाठींबा दिला आहे. फडणवीस यांनी मंत्रीमंडळात राहणार नसल्याचे जाहीर केेले नसले तरी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री बनावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.